पाकनं युद्धाची भाषा बदलली

December 30, 2008 4:34 AM0 commentsViews:

30 डिसेंबर, इस्लामाबादवाढत्या जागतिक दबावामुळे पाकिस्तानची युद्धाची भाषा आता जवळपास बंद झालीय. भारतासोबत निर्माण झालेला तणाव कमी करण्याचे संकेत पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल अश्फाक कियानी यांनी दिले आहेत. दोन्ही देशा दरम्यान गेले काही दिवस तणाव आहे, भारत-पाकिस्तान मधला तणाव दूर करण्यासाठी चीननंही पुढाकार घेतलाय. चीनचे उप परराष्ट्रमंत्री हे याफेई यांनी कयानी यांची भेट घेऊन चर्चा केली. कुठल्याच देशाला युध्द परवडणारे नाही असंही ते म्हणाले. दरम्यान, पाकिस्तानच्या जमीनीवरून अतिरेकी कारवाया चालू देणार नसल्याचं पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी म्हटलंय. मात्र मुंबई हल्ल्याबाबत अमेरिका आणि ब्रिटनने पुरवलेले पुरावे स्वीकारायला पाकिस्ताननं नकार दिला आहे.

close