महाराष्ट्र दिनी सर्वपक्षीयांची कोल्हापूर बंदची हाक

April 30, 2013 10:50 AM0 commentsViews: 30

30 एप्रिल

कोल्हापूर : इथं टोलनाक्यांच्या तोडफोडीविरोधात उद्या म्हणजे महाराष्ट्र दिनी सर्वपक्षीय बंद पुकारण्यात आला आहे. तसंच चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांना घेराव घालण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला. सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमाराला शहरातले 2 टोल नाके फोडण्यात आले.

फुलेवाडीचा टोलनाका जाळण्यात आला तर उचगावच्या टोलनाक्याची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. घटनास्थळी काही ठिकाणी मनसेचे झेंडे आढळल्यानं यामागे मनसे असल्याचा संशय व्यक्त होतोय. कोल्हापूर शहरात आयआरबी कंपनीने 220 कोटी रुपयांचा रस्ते विकास प्रकल्प राबवला. पण, निकृष्ट कामामुळे हा प्रकल्प वादात सापडलाय.

रस्त्यांच्या मोबदल्यात 30 वर्ष टोल द्यावा लागणार आहे. वाढता विरोध लक्षात घेऊन नगरविकास खात्याने टोलला स्थगिती दिली होती. पण, सरकारनं ही स्थगिती उठवल्याने पुन्हा एकदा शहरात टोलविरोधी आंदोलनानं जोर धरला आहे.

close