31डिसेंबरला मुंबईत कडोकोट बंदोबस्त

December 31, 2008 9:36 AM0 commentsViews: 1

31 डिसेंबर, मुंबईअजित मांढरे नुकताच मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीसांनी ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला आहे. शिवाय मुंबईतील अनेक महत्वाच्या ठिकाणी नाकेबंदीसह विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. नववर्षाचं स्वागत मुंबईकर नेहमीच धुमधडाक्यात करतात. 31 डिसेंबरची रात्रीचा रंग मुंबईत काही वेगळाच असतो. पण, नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळं यंदा मुंबईकरही नववर्षाचं स्वागत साधेपणानं करणार आहेत. सुरक्षा व्यवस्थेच्या कारणास्तव पोलीसांनी ठिकठिकाणी नाका बंदी केली आहे. येणार्‍या जाणार्‍या प्रत्येकाची कसून चौकशी केली जाईल. विशेष म्हणजे पोलिसांनी आता मुंबईतील प्रसिद्ध हॉटेल, हॉस्पिटल आणि हेरीटेज इमारतींनाही सुरक्षा व्यवस्था पुरवली आहे. खासगी सुरक्षा व्यवस्थेचाही पर्याय सुचवलाय. मुंबईपोलीसांनी तर प्रत्येक नागरिकानं सावध राहूनच सेलिब्रेशन करण्याचं आव्हानचं केलं आहे.नवर्षाच्या सुरूवातीलाच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसंच गेल्या वर्षीच्या 31 डिसेंबरच्या मध्यरात्री एका तरुणीच्या वियनभंगाची घटना घडली होती. तिची पुनरावृत्ती होऊ नये, या करता यावर्षी पोलिसांनी महिलांसाठी वेगळे कक्ष उभारले आहेत. निकामी सुरक्षा व्यवस्थेमुळंच दहशतवादी मुंबईत प्रवेश करू शकले होते. त्यामुळं आता मुंबई पोलीस डोळ्यात तेल घालून काम करतायत. शिवाय साध्या वेशातही मुंबई पोलीस 31 डिसेंबरच्या रात्री फिरणार आहेत.

close