‘इंडिया बुल्स रेल्वेमार्गासाठी भूसंपादन रद्द करा’

April 30, 2013 12:42 PM0 commentsViews: 19

30 एप्रिल

नाशिक : इंडियाबुल्सच्या खाजगी रेल्वेमार्गासाठी सक्तीने करण्यात येेणारे भूसंपादन रद्द करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केलीय. आपली संमती नसताना महसूल अधिकारी पोलीस बळाचा वापर करून मोजणी करत असल्याच्या तक्रारी शेतकर्‍यांनी महसूल आयुक्तांपुढे मांडल्या. नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यात इंडियाबुल्सच्या औष्णिक विद्युत केंद्राच्या कोळसा वाहतुकीसाठी हा रेल्वे मार्ग बांधण्यात येेणार आहे. त्यासाठी नायगाव, पिंपरी, जाखोडी अशा 10 गावांमधली 500 एकर जमीन संपादीत करण्यात येतेय. ही मोजणी थांबवण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली.

close