ग्रीष्माचा दाह कमी होवो, बाप्पाला फुलांची आरास

April 30, 2013 11:51 AM0 commentsViews: 93

30 एप्रिल

पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात ट्रस्टच्या वतीने वासंतिक उटी तसंच मोगरा महोत्सवाचं आयोजन केलंय. या महोत्सवात मोगरा, जाई-जुई,चाफा-चमेली,गुलाब,जास्वंद, केवडा, कणीस-दवना अशा विविध फुलांनी श्रींची मूर्तीसह गाभारा सभा मंडप सजवण्यात आलाय. चैत्र महिन्यात ग्रीष्माचा दाह कमी व्हावा यासाठी चंदन उटी तसंच मोगरा उत्सवाचं आयोजन करण्यात येतं.

close