अधिकार्‍याच्या घरात सापडले तब्बल 3 कोटी रूपये !

April 30, 2013 3:53 PM0 commentsViews: 34

30 एप्रिल

नाशिक : इथं सार्वजनिक बांधकाम खात्याच्या एक्झिक्युटीव्ह इंजिनिअरच्या घरात तब्बल 2 कोटी 96 लाखांची रोकड सापडली आहेत. 22 हजारांच्या लाचखोरी प्रकरणात अधिक तपासणी करत असताना एवढं मोठं घबाड अँटी करप्शन ब्युरोच्या हाती लागलं. सतीश चिखलीकर असं या अधिकार्‍यांच नाव आहे.

चिखलीकर आणि ब्रँच इंजिनिअर जगदीश वाघ यांना अँटी करप्शन ब्युरोनं लाच घेताना रंगेहात पकडलं. त्र्यंबकेश्वरमधल्या रस्त्याचं बिल मंजूर करण्यासाठी त्यांनी ठेकेदाराकडून 6 टक्के लाच मागितली होती. त्याचे 22 हजार घेताना त्यांना अटक करण्यात आलं. या प्रकरणाचा तपास करताना चिखलीकर यांच्या गुलमोहर या सरकारी बंगल्यातून तब्बल 2 कोटी 96 लाखांची रक्कम अँटी करप्शन ब्युरोला मिळाली. तर जगदीश वाघ यांच्या घरातून 35 हजार रुपये मिळालेत. तसंच 11 तोळे सोन्या चांदीचे दागिने आणि मोठ्या मालमत्तांची कागदपत्रंही या दोघांच्या घरातून मिळाली आहेत.

close