उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलंय-राणे

April 30, 2013 4:05 PM0 commentsViews: 33

30 एप्रिल

उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांचं मानसिक संतुलन बिघडलंय अशी घणाघाती टीका राणेंनी केली. कोकणासाठी शिवसेनेचं योगदान काय असा सवालही नारायण राणेंनी केला. कोकणातल्या प्रकल्पांना विरोध करून दाखवा असं आव्हानही त्यांनी शिवसेनेला दिलं. कुडाळ इथं झालेल्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राणेंवर टीकास्त्र सोडले होते. कोकणाच्या विकासाचे स्वप्न दाखवून राणे यांनी आपल्या मुलांनाच खासदारकी, आमदारकी देऊ केली. पण कधी त्यांना लोकसभा गाजवली नाही ना लोकांची काम केली नाही. एवढंच नाही तर अनेक प्रकल्प कधीच पूर्ण होऊ दिली नाही असा आरोप ठाकरे यांनी केला होता.

close