मुंबई मेट्रोची यशस्वी ‘भरारी’

May 1, 2013 10:37 AM0 commentsViews: 45

01 मे

मुंबईकर गेली दोन वर्षं आतुरतेने वाट पाहत असलेल्या मेट्रो रेल्वेची पहिली चाचणी आज यशस्वीपणे पार पडली. मुंबईच्या पश्चिम आणि पुर्व उपनगरांना जोडणारा हा प्रमुख रेल्वे मार्ग असणार आहे. आज महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पहिल्या मेट्रो रेल्वेला हिरवा झेडा दाखवला. वर्सोवा डेपोतून निघालेली मेट्रो आझाद नगर असा साडे तीन किलोमीटरचं अंतर कापून थांबली. मोठ्या जल्लोषात मुंबईकरांनी मेट्रोचं स्वागत केलंय. या मेट्रोचे वैशिष्ट असे की, संपूर्ण मेट्रोही वातानुकुलीत आहे. आतील भागात सुसज्ज अशी मांडणी करण्यात आली आहे. मधल्या भागात लोकांना उभे राहण्याची जागा मोकळी सोडण्यात आली तर आतील दोन्ही बाजूस बसण्यास जागा करण्यात आली आहे. सर्वात दिलासादायक बाब म्हणजे मेट्रोचे तिकीट हे 8 रूपये ते 15 रूपये असणार आहे. मेट्रो रेल्वेची वैशिष्ट्यं

1) मार्च 2008 साली सुरू झालेला हा प्रकल्प 2012 साली पूर्ण करण्याचं टार्गेट होतं. पण प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न न सुटल्यामुळे या प्रकल्पाला 1 वर्षाचा उशीर झाला. 2) मेट्रो रेल्वेच्या पहिल्या टप्यात वर्साेवा ते घाटकोपर हा 12 किलोमीटरचा मार्ग असणार आहे.3) या मार्गावर प्रत्येक किलोमीटरला एक स्टेशन असणार आहे. म्हणजेच एकूण 12 रेल्वे स्टेशन असणार आहेत.4) पहिल्या टप्यातील हा मेट्रो रेल्वेचा मार्ग संपूर्णपणे एलिव्हिेटीड असणार आहे.5) या पहिल्या प्रकल्पाला 2,356 कोटी रुपये खर्च आला.6) प्रवाश्यांसाठी खुष खबर म्हणजे ही मेट्रो रेल्वे संपूर्ण वातानुकुलीत असणार आहे.7) या मेट्रो रेल्वेच्या प्रवासाचे दर देखिल 8 रुपयांपासून ते 15 रुपयांपर्यंत असणार आहे.

close