‘गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न लवकरच सोडवू’

May 1, 2013 4:29 PM0 commentsViews: 115

01 मे

मुंबई : गिरणी कामगारांच्या घरांचा प्रलंबित प्रश्न लवकरच सोडवू असं आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलंय. कामगार दिनाचं औचित्य साधून प्रभादेवीमध्ये गिरणी कामगार संघर्ष समितीने गिरणी कामगार चळवळीतल्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

'मी गिरणी कामगारांच्या बाजूचाच आहे. कामगारांच्या लढ्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे, गिरणी कामगारांच्या हितासाठी जे काही करता येईल ते ते मी करण्याचा प्रयत्न करेन असं मतही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलंय. या कार्यक्रमाला सारस्वत बँकेचे अध्यक्ष एकनाथ ठाकूर आणि आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे उपस्थित होते. या कार्यक्रमात पत्रकार युवराज मोहिते आणि मीना कर्णिक यांनी कामगारांच्या मुलाखती घेऊन गिरणी कामगार चळवळीवर प्रकाश टाकला.

close