जलतरणपटू विनोद घाडगेचा दुदैर्वी मृत्यू

December 30, 2008 10:07 AM0 commentsViews: 1

30 डिसेंबर, मुंबईगोविंद तुपेजलतरणपटू विनोद घाडगे यांचा दुदैर्वी मृत्यू झाला आहे. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध आणि शहिदांना श्रद्धांजली म्हणून, विनोद धरमतर ते गेट वे ऑफ इंडिया हे अंतर पोहून जाणार होता. गेट वे ऑफ इंडियाला पोहताना मासे पकडण्याच्या जाळीत अडकून त्यांचा दुदैर्वी मृत्यू झाला.खरं तर याआधीही विनोद घाडगे यांनी हे अंतर सात वेळा पोहून पार केलं होतं. मात्र या वेळेस वाटेतल्या मासे पकडण्याच्या जाळ्याने त्यांचा घात केला. वास्ताविक पहाता त्यांच्या पुढे आणि मागे सुरक्षेसाठी बोटी होत्या, मात्र हा प्रकार एवढा झटपट घडला की मदत पोहचण्यापूर्वीच त्यांचा दुदैर्वी अंत झाला.विनोदच्या मृत्यूमुळे क्रीडा क्षेत्राला मोठा धक्का आहे. जलतरणात साहसी मोहिमा त्याने पूर्ण केल्या आहेत. विनोदला शिवछत्रपती पुरस्कारही जाहीर झाला आहे. लवकरच तो विनोदला देण्यात येणार होता. मात्र तो स्वीकारण्यापूर्वीच त्याचा दुदैर्वी मृत्यू झाला.

close