माझ्या भावाची हत्या झाली,सरबजीतच्या बहिणीचा आरोप

May 2, 2013 12:52 PM0 commentsViews: 10

02 मे

सरबजीत सिंगच्या मृत्यूनंतर भारतामध्ये संतापाची लाट उसळली आहे. माझा भाऊ सरबजीत देशासाठी शहीद झाला आहे. त्याच्यावर जे आरोप करण्यात आले होते ते तो भारतीय आहे म्हणून करण्यात आले होते. मागेही सरबजीतला सोडण्याचं नाटक का केलं ? असा संतप्त सवाल सरबजीत सिंगची बहिणी दलबीर कौर यांनी विचारला.माझ्या भावाचा मृत्यू ही हत्या असल्याचा आरोपही त्यांनी केला केला. पाकिस्ताननं भारताच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. पाकला धडा शिकवण्यासाठी सर्व भारतीयांनी एकत्र यावे असं आवाहनही त्यांनी केलं.

close