नवी मुंबईत अतिक्रमण विरोधी मोहीम

December 30, 2008 8:58 AM0 commentsViews: 4

29 डिसेंबर, मुंबईनवी मुंबईतल्या घणसोली शहरातल्या, सावली गावातली अनधिकृत 349 घरं पाडण्याची मोहीम हाती घेतली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात येत आहे. 349 पैकी 340 घरं अनधिकृत असल्याचं,सिडकोचं म्हणणं आहे. नऊ घरं जुनी असल्यामुळे ती पाडण्यात येणार नाहीत. ही कारवाई पार पाडण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा इथे लावण्यात आला आहे. माजी महापौर संजीव नाईक यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. ही मोहीम शेवटच्या टप्प्यात आली आहे. यावेळी नागरिकांचा मोठा जमाव माजी महापौर संजीव नाईक यांच्या नेतृत्वाखाली जमला होता. त्यांनी प्रशासकीय अधिकार्‍यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. या वेळेस झालेल्या वादावादीनंतर संजीव नाईक आणि काही कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.नवी मुंबईत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणं झाली आहेत. मात्र या वेळेस सीडकोनं कोणतीही हयहगय न करता अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली आहे. त्यामुळे इतर अनधिकृत बांधकामांचे मालकही धास्तावले आहेत.

close