बांग्लादेश निवडणुकीत शेख हसिना यांना बहुमत

December 30, 2008 7:37 AM0 commentsViews: 16

30 डिसेंबर, ढाकाबांग्लादेशच्या माजी मुख्यमंत्री शेख हसिना यांच्या नेतृत्वाखालील राजकीय आघाडीनं तेथील सार्वत्रिक निवडणुकीत मोठं यश मिळवलं आहे. आत्तापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार हसिना शेख यांच्या आवामी लीगनं 300 पैकी 261 जागांवर विजय मिळवला आहे. त्यांच्या प्रतिस्पर्धी खलिदा झिया यांना जेमतेम 30 जागांवर विजय मिळाला आहे. या निकालांमुळे बांग्लादेशमध्ये आगामी सरकार आवामी लीगचंच असणार हे आता स्पष्ट झालं आहे.गेली दोन वर्ष बांग्लादेशमध्ये राष्ट्रपती राजवट होती. सात वर्षानंतर बांग्लादेशमध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या.मात्र मतदारांसमोर कोणताही नवीन पर्याय नव्हता. तरीही लोकशाहीविषयी आस्था दाखवत मोठ्या प्रमाणात नागरिकांनी मतदान केलं.शेख हसिना आणि खलिदा झिया यांच्यामध्ये सत्तेसाठी नेहमीच अटीतटीचा संघर्ष झाला आहे. 1991 आणि 2001 च्या निवडणुकीत झिया यांनी बाजी मारली होती, तर 1996 मध्ये शेख हसिना विजयी झाल्या होत्या. निवडणुकीत पंतप्रधानपदाच्या उमेदवार असलेल्या शेख हसिना आणि खलिदा झिया या दोघींवरही मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यासाठी दोघींना जेलची हवाही खावी लागली होती. मात्र आपल्यावरील आरोप रोजकीय हेतुंनी प्रेरीत असल्याचं दोघींनीही म्टलं होतं. दोघींचाही प्रचार स्वच्छ प्रशासन आणि वाढता महागई दर या मुद्द्यांभोवतीच एकवटलेला होता. मात्र या निवडणुकांनंतर किमान बांग्लादेशमधली अस्थिरता संपेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.याआधी 2007 मध्ये बांगलादेशमध्ये निवडणुका घेण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र दंगली आणि प्रचंड हिंसाचारामुळे तो यशस्वी झाला नव्हता. त्या वेळेस लष्करानं हस्तक्षेप करत शांतता प्रस्थापित करण्यास हातभार लावला होता. त्यानंतर लष्करानं राष्ट्रपती राजवट लागू केली होती.

close