राज ठाकरेंची चारा छावणीला भेट

May 3, 2013 5:27 PM0 commentsViews: 53

05 मे

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मनसेतर्फे सुरू करण्यात आलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा तालुक्यातील अष्टामोडच्या चारा छावणीला भेट दिली. राज ठाकरे गेल्या महिन्यात जिल्ह्यातल्या दुष्काळीची पाहणी करण्यासाठी आले असता दुष्काळग्रस्तांना मनसेतर्फे योग्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर त्यांनी यापूर्वी जिल्ह्यात पाणी पुरवठ्यासाठी 10 टँकर दिले आहेत. त्याच प्रमाणे अष्टामोडमध्ये 500 जनावरांची मोफत चारा छावणीही सुरू केलीय. याच छावणीची पाहणीकरण्यासाठी आणि दुष्काळग्रस्तांशी संवाद साधण्यासाठी ते उस्मानाबाद जिल्ह्यात आले होते.त्यांच्या सोबत आमदार बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि कार्यकर्तेही होते.

close