भारत-पाकमध्ये अणुयुद्ध झालं तर…

December 30, 2008 8:08 AM0 commentsViews: 177

30 डिसेंबर , मुंबई मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान युद्धाच्या शक्यतेचा प्रश्नही चर्चेत आहे. या युद्धाच्या शक्यतेत दोन्ही देशांमधल्या युद्धाची अणुयुद्धाची शक्यता वर्तवली जात आहे. न्युक्लिअर पॉवर असलेल्या या दोन देशात अणुयुध्द झालं तर त्याचे परिणाम भयंकर गंभीर असतील, असा अहवाल अमेरिकेच्या ' नॅचरल रिसोर्स डिफेन्स काउन्सिल रिसर्च 'ने म्हणजेच एनआरडीसी ह्या संस्थेनं दिला आहे. 2002 साली अमेरिकेच्या एनआरडीसीनं एक अभ्यास केला. त्यात पाकिस्तानकडे भारतापेक्षा जास्त अणुबॉम्ब असल्याचं म्हटलं आहे. भारताकडे 35 अणुबॉम्ब आहेत. तर पाकिस्तानकडे 48 अणुबॉम्ब आहेतं. ऑगस्ट 1945 साली अमेरिकेनं जपानवर टाकलेला एक अणुबॉम्ब 15 किलो टनचा होत. तर दुसरा 21 किलोटनचा होता. भारत आणि पाकिस्तानकडे असलेले बॉम्ब हे हिरोशिमा आणि नागासाकीवर टाकण्यात आलेल्या अणुबॉम्बच्या जवळपास 10 पट जास्त तीव्रतेचे आहेत. पाकिस्तानकडे असेलेले अणुबॉम्ब मिसाईल्सच्या स्वरुपात आहेत.तर भारताचा अणुबॉम्ब ग्रॅव्हीटीबॉम्बच्या स्वरुपात असुन ते लढाऊ विमानांच्या पंखाखाली ठेवण्यात आले आहेत. एनआरडीसीच्या अहवालानुसार भारत आणि पाकिस्तान यांनी एकमेकांवर अणुबॉम्ब टाकले तर काय काय नुकसान होऊ शकतं याची आकडेवारीचं प्रसिद्ध केली आहे. भारतातली प्रमुख पाच शहरांवर हल्ले होउ शकतात असं एनआरडीसीचा अहवाल सांगतो.आयटी हब असलेल्या बंगलोरवर हल्ला झाला तर तीन लाख चौदा हजार नउशे अठ्‌ठ्यात्तर लोक मृत्यूमुखी पडू शकतात. मुंबईवर अणुबॉम्बमुळे 4 लाख 77 हजार 317 लोक मृत्यूमुखी पडू शकतात. चेन्नईमध्ये 3 लाख 4 हजार 299 आणि नवी दिल्लीतील 1 लाख 77 हजार 518 लोक मृत्यूच्या छायेत येऊ शकतात. थोडक्यात भारतातले 1कोटी 46 लाख 22 हजार 937 लोक अणुबॉम्बमुळे धोक्यात येऊ शकतील.त्याचवेळी पाकिस्तानलाही त्याचा मोठा फटका बसू शकतो. फैसलाबादमधले 3 लाख 36 हजार 247 लोक मरणाच्या छायेत येऊ शकतात. पाकिस्तानची राजधानी असेलेल्या इस्लामाबादमधले 1 लाख 54 हजार 67 लोक मृत्यूमुखी पडू शकतात. पाकिस्तानची आर्थिक राजधानी असलेल्या कराचीमधले 2 लाख 48 हजार सहाशे 43 लोक मरणाच्या छायेत येऊ शकतात. तर लाहोरमधले 2 लाख 58 हजार 139 लोक तर रावळपिंडीतले 1 लाख 83 हजार 791 लोक मरणाच्या छायेत असू शकतात. भारत आणि पाकिस्तानातले मिळून सव्वाअब्ज लोकांच्या शरीरात अणुबॉम्बच्या रेडीएशनमुळे अनुवंशीक हानी होऊ शकते.असा अहवाल नॅचरल रिसोर्सेस डिफेन्स काउन्सिलनं दिलाय. त्यामुळे खरंच जर युद्ध झालं तर ते दोन्ही देशांश्साठीच नव्हेतर जगासाठीही किती गंभीर असेल हेच या अहवालावरुन स्पष्ट होत आहे.

close