धनंजय दातारांचा लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये समावेश

May 4, 2013 3:32 PM0 commentsViews: 103

04 मे

मसालाकिंग धनंजय दातार यांचा नुकताच लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये समावेश करण्यात आला आहेत. युएईमधिल पन्नास श्रीमंत भारतीय उद्योजकांच्या यादीत दातार यांनी 19 व्या क्रमांकावर झेप घेतलीय. अरेबियन बिझनेसनं नुकत्याच प्रसिध्द केलेल्या या यादीत दातार हे एकमेव मराठी उद्योजक आहेत. गेल्या पाच वर्षात दातार यांच्या अल अदिल उद्योग समुहाने युएईतील सुपरमार्केटची संख्या पाचवरून तब्बल पंचवीसवर नेलीय. उद्योगातील याच यशाची माहिती देण्यासाठी आणि उद्योग व्यवसाय स्थापनेचं 30 वं वर्ष साजरं करण्यासाठी दातार यांनी खास फ्रेंच बनावटीच्या काचेच्या बोटीत पत्रकार परिषदेत घेतली होती. या अनोख्या विक्रमाची नोंद लिम्का बुकनं घेतलीय.

close