टक्क्या,टक्क्याने साचला भ्रष्टाचाराचा ‘चिखल’ !

May 6, 2013 5:22 PM0 commentsViews: 79

06 मे

नाशिक लाचखोर प्रकरणी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता सतीश चिखलीकर हा सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याच्या चौकशीत पीडब्ल्यूडी विभागात कशी टक्केवारी चालते हे उघडकीस येत आहे. नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम विभागात कशी लाचखोरीची टक्केवारी लागते याचा हा स्पेशल रिपोर्ट ..

सतीश चिखलीकर…साधा कार्यकारी अभियंता… सार्वजनिक विभागात नोकरीला लागला आणि कोट्याधीश झाला. सध्या त्याच्याकडे 15 कोटी रुपयांची मालमत्ता सापडली आहे. या अधिकार्‍याविरोधात एका कंत्राटदाराने तक्रार केली. त्या कंत्राटदाराकडे वाघ या अधिकार्‍याने 6 टक्के रक्कम मागितली होती.

सहा टक्के रक्कम केवळ अधिकार्‍यांसाठी होती. त्या व्यतिरिक्त इतर अधिकारी कर्मचार्‍यांना कशी टक्केवारीत लाच दिली जाते ते धक्कादायक आहे. पीडब्ल्यूडी विभागात दोन पातळीवर कामं चालतात.

दोन विभाग कोणते?

1. कार्यालयीन कामकाज आणि 2. साईट विंग

कार्यालयीन कामकाज विंग – पी.ओ. असतो त्याला 0.2 टक्के लाच मिळते- पी.ए. असतो त्याचाही टक्का 0.2 टक्के इतकाच असतो- ऑडिटर असतो त्याला 0.2 टक्के लाच दिली जाते- अकाऊंटंट असतो, त्याला अर्धा टक्के लाच दिली जाते- चेक काढणार्‍याला 0.1 टक्के लाच दिली जाते- बीडीएस असतो, त्यालाही 0.1 टक्के लाच दिली जाते

तर दुसर्‍या साईट विंगमध्ये – एसडीसी असतो, त्याला 0.2 टक्के लाच दिली जाते- कारकून असतो, त्याला 0.1 टक्के लाच दिली जाते- कॉम्प्युटर ऑपरेटर असतो, त्याला 0.1 टक्के लाच दिली जाते

चिखलीकर सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याच्या चौैकशीत खरं काय ते बाहेर येण्याची शक्यता आहे.

close