विधिमंडळाच्या कामकाजात सेनेचे आमदार सहभाग घेणार नाही – उध्दव ठाकरे

March 25, 2011 3:42 PM0 commentsViews: 2

25 मार्च

अर्थसंकल्पात गोंधळ घालणार्‍या आमदारांचं निलंबन मागे घेतल्याशिवाय विधिमंडळाच्या कामकाजात शिवसेनेचा एकही आमदार भाग घेणार नाही अशी भूमिका शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली. शिवालय इथं झालेल्या आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी ही भूमिका स्पष्ट केली. बैठकी दरम्यान शिवसेना आमदारांनी उद्धव ठाकरेंसमोर सरकारच्या मुस्कटदाबीचा पाढा वाचला. सरकारच्या मुस्कटदाबीवर शिवसेनेचे आमदार संताप व्यक्त करत आहे. कामकाजावर शिवसेनेचा बहिष्कार कायम राहणार आहे.

close