आमदारांच्या निलंबनावरून शिवसेनेचं ठिकठिकाणी आंदोलन

March 25, 2011 10:50 AM0 commentsViews: 4

25 मार्च

विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दिवशी शिवसेना आणि भाजपयुतीच्या 9 आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. याच्याच निषेधार्थ आज शुक्रवारी बदलापुरातील शिवसैनिकांनी आघाडी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केलं आणि आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. तर ठाण्याच्या कापूरबावडी परिसरामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करत आघाडी सरकारचा पुतळा जाळला. ठाण्यातल्या दोन आमदारांचं निलंबन झाल्याने शिवसेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. अशाच प्रकारचं आंदोलन टेंभी नाका परिसरात झालं. तिथे पुतळा जाळणार्‍या 12 शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

close