मढीच्या यात्रेला लाखो भाविकांची हजेरी

March 25, 2011 8:37 AM0 commentsViews: 57

25 मार्च

भटक्यांची पंढरी समजली जाणार्‍या मढीच्या कनिफनाथ यात्रेला लाखो भाविकांनी हजेरी लावली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात ही यात्रा भरत असते. ही यात्रा रंगपंचमीला सुरू होते आणि पाडव्यापर्यंत चालते. यात पारंपरिक पद्धतीनं मानाच्या काठ्यांच्या मिरवणुका निघाल्या. यावेळी कनिफनाथांच्या समाधी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या यात्रेचं वैशिष्ट्‌य म्हणजे गाढवांचा बाजार. राजस्थान, काठेवाडी यासारख्या विविध जातींची गाढवं या बाजारात विक्रीसाठी येतात. यंदा 15 हजार गाढवांची विक्री झाली. या व्यवहारात जवळपास दीड कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे.

close