सिंगल स्क्रीन थिएटर्स 31 मार्चपर्यंत बंद

March 25, 2011 11:53 AM0 commentsViews: 2

25 मार्च

आज शुक्रवारपासून सिंगल स्क्रीन थिएटर्स संपाला सुरूवात झाली आहे. सिनेमा ओनर्स ऍण्ड एक्झिबिशन असोसिएशन ऑफ इंडियाने ही घोषणा केली आहे. मात्र या आठवड्यात रिलीज होणार्‍या मराठी सिनेमांचं यामुळे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जातं आहे. 31 मार्चपर्यंत सर्व सिंगल स्क्रीन थिएटर्स बंद राहणार आहेत. एक तर मल्टिप्लेक्सबरोबरची वाढती स्पर्धा आणि तिकिटाच्या किमतीच्या 45 टक्के पैसे करमणुकीच्या करातच जातात. त्यामुळे करकपात करावी या त्यांच्या मागणीकडे सरकार दुर्लक्षचं करतंय. त्यामुळेच सिंगल थिएटर्सवाल्यांनी हे पाऊल उचलले आहे. दरम्यान या निर्णयामुळे सिने निर्माता तसेच कलाकारांचं मात्र नुकसान होणार आहे.

close