मुलं फेकण्याची अघोरी प्रथा

March 25, 2011 12:18 PM0 commentsViews: 43

25 मार्च

एकविसाव्या शतकाकडे आपली वाटचाल सुरु असली तरी ग्रामीण भाग मात्र अजूनही जुन्या रुढी परंपरेत अडकलेला पाहायला मिळतो. पाटण तालुक्यातील नाडोली या गावात मंदिराच्या 15 फुटावरुन लहान मुलं खाली फेकण्याचा धक्कादायक प्रकार असाच अजूनही सुरु आहे. या प्रथेला 'मुलं उधळणे' असं म्हटलं जातं. नाडोली गावात श्री धुळेश्वर देवाची यात्रा रंगपंचमीच्या दिवशी मोठ्या उत्साहात भरते. यावेळी नवस बोलणारे भाविक आपल्या 1 वर्षापासून ते 5 वर्षाच्या मुलांना मंदिरावर बसलेल्या लोकांकडे देतात. खाली चादर पकडून वरुन फेकलेल्या मुलाला झेललं जातं.

मात्र या प्रकारात थोडी जरी चूक झाली तरी लहान मूल जखमी होऊ शकते पण कोणताही अपघात आजार होऊ नये यासाठी आम्ही हे मुलं उधळण्यासाठी परंपरा जपतो आहे. अशी या भाविकांची श्रध्दा आहे. या यात्रेत घोंगडे पांघरलेला देवऋषी भविष्यकाळाची भाकनुक म्हणजे भाकीत करतो हे भाकीत 75 टक्के खरं ठरतं असं या भाविकाचं म्हणणं आहे. पुरोगामी महाराष्ट्रात अजुनही अशा खोचक अंधश्रध्दांना ग्रामीण भागातील नागरिक बळी पडत आहेत. मात्र प्रशासन अशा प्रथांकडे दुर्लक्ष करत आहे. पाटणसारख्या दुर्गम आणि डोंगराळ भागात अनेक ठिकाणी अशा प्रथा अजूनही राजरोस सुरु आहेत.

close