नागपूरमध्ये महाविद्यालयात ट्रक घुसला, दोन मुले ठार

December 30, 2008 8:59 AM0 commentsViews: 5

30 डिसेंबर, नागपूरनागपूरमध्ये प्रकाश कृषी महाविद्यालयात ट्रक घुसल्याची घटना घडली आहे. पारडी भागात ही दुर्घटना घडली. या प्रकारात दोन मुलं ठार तर वीस जण जखमी झाली आहेत. जखमींपैकी पाच मुलं अत्यवस्थ असल्याचं सांगण्यात येतंय.नागपूर-भंडारा रस्त्यावर या महाविद्यालयाच्या आवारात सकाळी अचानक एक ट्रक घुसला आणि मुलांना चिरडत पुढे गेला. घटनास्थळी पोलीस आणि प्रशासन पोहचले. याघटनेनंतर दोन ते तीन हजार नागरिकांचा जमाव घटनास्थळी जमला. संतप्त नागरिकांनी बसवर दगडफेक केली. नागपूर-भंडारा रस्त्यावरून नेहमीच भरधाव वेगात वहाने चालवली जातात. हाच रस्ता छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्येही जात असल्याने लोडेड ट्रक मोठ्या प्रमाणात या रस्त्याचा वापर करतात. गेल्या काही दिवसात अती वेगामुळे या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वेगावर अंकुश ठेवण्यासाठी प्रशासनाकडून पावले उचलली जावीत अशी नागरिकांची मागणी आहे.

close