मुंबईत इमारतीच्या पुनर्विकासासाठी 3 एफएसआय देण्याची घोषणा

March 25, 2011 1:59 PM0 commentsViews: 6

25 मार्च

मुंबई शहरातील जुन्या आणि मोडकळास आलेल्या इमारतीच्या पुनर्विकासासाठी 3 एफएसआय देण्याची घोषणा गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांनी विधानपरिषदेत केली. काँग्रेस सदस्या अलका देसाई यांनी याबद्दल विशेष चर्चा उपस्थित केली होती. मुंबई शहरातील या मोडकळीला आलेल्या इमारतींचा प्रश्न गंभीर असल्याचं त्यांनी मान्य केलं. या इमारतीमध्ये राहणारे मुंबईकर हे या शहराचे जुने रहिवाशी आहेत. त्यांना या शहरातून हद्दपार होऊ दिलं जाणार नाही. आतापर्यंत या इमारतीच्या विकासाला 2.5 एफएसआय दिला जायचा आता तो 3 एवढा दिला जाईल अशी घोषणा अहिर यांनी यावेळी केली

close