युवराज खेळतोय एका खास व्यक्तीसाठी

March 25, 2011 2:12 PM0 commentsViews: 1

25 मार्च

भारतीय टीमचा युवराज. वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी आऊट ऑफ फॉर्म असलेला, व्हाईस कॅप्टनपदावरुन हकालपट्‌टी झालेला, अफेअर करणारा, आणि बरंच काही, काल परवापर्यंत बॅड बॉय असलेला युवराज आता तो टीमचा हिरो बनला आहे. त्याच्या या यशाबद्दल विचारले असता तो एका खास व्यक्तीसाठी खेळतोय असा खुलासा त्याने केला आहे.

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीमच्या सेमीफायनलपर्यंतच्या प्रवासात युवराजचा वाटा मोलाचा आहे. एक दोन नव्हे तर तब्बल चार वेळा त्यानं टीमला एकहाती विजय मिळवून दिला आणि चारवेळा बनलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. पण या बदललेल्या युवराजच्या यशाचं रहस्य तरी काय आहे. युवराजनं मात्र याचं श्रेय दिलंय एका खास व्यक्तिला. तो म्हणतो की, मी एका खास व्यक्तीसाठी खेळत आहे.

आता ही खास व्यक्ती कोण, हे मात्र त्यानं गुलदस्त्यात ठेवलं आहे. भारतीय टीमनं फायनलमध्ये प्रवेश केल्यावर या व्यक्तीचं नाव जाहीर करु असं सांगत युवराजने सस्पेन्स वाढवला आहे. ज्या व्यक्तीसाठी युवराज स्वप्नवत कामगिरी करतोय ती व्यक्ती आहे तरी कोण यावर मात्र चर्चेला उधाण आलं आहे. मीडियाबरोबरच क्रिकेटप्रेमींही याचा शोध घेतायत. पण सध्यातरी सगळे एकच प्रार्थना करतायत ती म्हणजे पाकिस्तानविरुध्द युवराज पुन्हा एकदा चमकू दे आणि भारतीय टीम फायनलमध्ये प्रवेश करु दे.

close