हसन मुश्रीफ यांनी केला कुलथेंवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल

March 25, 2011 2:37 PM0 commentsViews: 20

25 मार्च

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी संघटनेचे सरचिटणीस गणपत कुलथे यांच्यावर कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी एक कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. कोल्हापुरातील दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे.अतिरीक्त जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे हत्या प्रकरणानंतर आय.बी.एन लोकमतच्या आजच्या सवाल कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी संघटनेचे सरचिटणीस गणपत कुलथे यांनी वाळू माफियाना कामगारमंत्री मुश्रीफ हे पाठीशी घालतात अस वक्तव्य केलं होतं.यानंतर कामगारमंत्री मुश्रीफ यांनी आपली जाहीर माफी कुलथे यांनी मागावी अशी मागणी कुलथे यांच्याकडे केली होती. पण कुलथे यांनी माफी मागण्यास विरोध दर्शविल्यानं कामगारमंत्री मुश्रीफ यांनी कोल्हापूरच्या दिवाणी न्यायालयात त्याच्याविरोधात अब्रुनुकसानीचा 1 कोटीचा दावा दाखल केला आहे.

close