ख्याल ट्रस्टनं केला सर्वोत्तम रसिकाचा गौरव

December 30, 2008 8:59 AM0 commentsViews: 2

30 डिसेंबर, मुंबई विनोद घाटगे नटसम्राट बालगंधर्व हे रसिकांना मायबाप म्हणत असत. कारण कलाकारांच्या कलेची खरी कदर सच्चा रसिकच करू शकतो. स्टेजवरील कलाकाराइतकाच प्रेक्षागॅलरीतला पे्रक्षकही महत्त्वाचा असतो.अशाच एका सच्चा रसिकाचा खास सत्कार करण्यात आला. निमित्त होतं पं.अरोलकर संगीत महोत्सवाचं. त्या सच्चा रसिकांचं नाव आहे तारा घियारा. 'ख्याल' या संस्थेतर्फे प्रत्येक वर्षी पं. शरदचंद्र अरोलकर संगितमहोत्सव आयोजित केला जातो. या महोत्सवात अनेक दिग्गज कलाकारांच्या गायन-वादनाचं आयोजन केलं जातं. त्याचबरोबर अशा कलाकारांच्या कलेला सतत प्रोत्साहन देणार्‍या एका निवडक रसिकाचा खास सत्कारही करण्यात येतो. 'ख्याल' संस्थेची ही परंपरा गेली 10 वर्ष अखंडपणे सुरू आहे. तारा घियारा या विलक्षण संगीतप्रेमी आहेत. त्यांनी वर्षात जवळजवळ 100 हून अधिक कार्यक्रमांना उपस्थित राहून या वर्षीच्या सर्वोत्तम रसिकाचा बहुमान पटकावला आहे. " संगीत ही शेवटी प्रयोगक्षम कला आहे. यात प्रेक्षकाचा सहभागाचा महत्त्वाचा असतो. त्यादृष्टीनं ख्याल ट्रस्टनं जाणकार श्रोत्यांच्या सत्काराचा गौरव करण्याची एक परंपरा सुरू केली आहे, " अशी माहिती ख्याल ट्रस्टच्या कार्यक्रमांचे संयोजक अमरेन्द्र धनेश्वर यांनी दिली आहे. कलाकार आणि त्याच्या कलेला दाद देणारी रसिकता या दोन्हींचा सन्मान करणारा हा अनोखा महोत्सव असाच अखंडपणे सुरु रहावा अशीच प्रत्येकाची भावना आहे.

close