मोहन वाघ यांच्या आत्मचरित्राचं प्रकाशन

March 25, 2011 3:09 PM0 commentsViews: 9

25 मार्च

ज्येष्ठ नाट्यनिर्माते मोहन वाघांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या आठवणींचे ढग रंगीबेरंगी या आत्मचरित्राचं प्रकाशन करण्यात आलं आहे. यावेळी मोहन वाघांच्या कुटुंबीयासोबत जेष्ठ पत्रकार कुमार केतकर, पानीपतकार विश्वास पाटील, कवीयत्री शिरीष पै आणि जेष्ठ नाट्यकर्मी विजय मेहता या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित होते. तर महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ही उपस्थिती होती. मोहन वाघांचे आत्मवृत्त असलेलं हे पुस्तक त्यांनी लिहायला घेतलं होतं. पुस्तकाची 80 पान लिहिल्यावर त्यांचं निधन झालं. आता त्या पुस्तकात वाघकाकांच्या जवळच्या माणसांनी त्यांच्या आठवणी लिहिल्या आहेत.

close