दक्षिणआफ्रिका पुन्हा चोकर्स ; किवी सेमीफायनलमध्ये

March 25, 2011 4:33 PM0 commentsViews: 1

25 मार्च

वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या टीमवर पुन्हा एकदा चोकर्सचा शिक्का बसला आहे. आज शुक्रवारी झालेल्या क्वार्टर फायनल मॅचमध्ये न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेवर 49 रन्सनं मात करत सेमीफायनल गाठली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या टीमला जेतेपदासाठी पहिली पसंती देण्यात आली होती. पण आजच्या मॅचमध्ये आफ्रिकेचा फ्लॉप शो झाला.

न्यूझीलंडने आफ्रिकेसमोर विजयासाठी 222 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. याला उत्तर देताना दक्षिण आफ्रिकेची टीम ऑलआउट झाली. न्यूझीलंडच्या दमदार बॉलिंगसमोर आफ्रिकन बॅट्समनने सपशेल शरणागती पत्कारली होती. जॅक कॅलिसनं 47 रन्स करत एकाकी झुंज दिली. पण त्याला इतर बॅट्समनची साथ मिळाली नाही. न्यूझीलंडतर्फे जेकब ओरामनं सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडची गाठ आता श्रीलंका आणि इंग्लंडदरम्यानच्या विजेत्याशी पडेल.

close