हिवाळी अधिवेशनात शेतकर्‍यांना पॅकेज मिळण्याची शक्यता

December 30, 2008 4:11 AM0 commentsViews: 1

30 डिसेंबर, नागपूरविधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात सोमवारी घरेलू कामगारांना सामाजिक सुरक्षा देण्याचा कायदा तयार करण्यात आला. तसंच आंदोलना दरम्यान सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झाल्यास त्याची नुकसान भरपाई आंदोलकांकडून वसूल करण्याचाही कायदा अस्तित्वात आला. घरेलू कामगार सुरक्षा विधेयक आणि मुंबई पोलीस सुधारणा विधेयक सोमवारी विधान परिषदेत मंजूर करण्यात आलं. हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे . हिवाळी अधिवेशनाच्या 26 लाख शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याचा शासनाचा विचार आहे. सोमवारी रात्री मंत्रीमंडळाची बैठक झाली. पण त्यामध्ये पॅकेजच्या आरखड्यावर शिक्कामोर्तब होऊ शकलं नाही. त्यामुळे आज होणार्‍या मंत्रीमंडळाच्या बैठकीत पुन्हा हा विषय चर्चेला येणार आहे

close