पंतप्रधानांना अडचणीत आणण्याचा विरोधकांचा प्रयत्न

March 25, 2011 5:34 PM0 commentsViews: 2

25 मार्च

संसदेच्या बजेट अधिवेशनाचं सूप आज वाजलं. घोटाळ्यांच्या अनेक मुद्द्यांवरून विरोधकांनी सरकारला विशेषतः पंतप्रधान मनमोहन सिंग यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. विकिलिक्सनं केलेल्या कॅश फॉर वोट प्रकरणाच्या गौप्यस्फोटामुळे अनेक घोटाळ्यांच्या गर्तेत सापडलेल्या यूपीएची आणखीनच कोंडी झाली.

बजेट अधिवेशनात सीव्हीसी ते कॅश फॉर वोट प्रकरणावरून विरोधकांनी सरकराला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. सर्वाधिक मुद्दा गाजला तो म्हणजे विकिलिक्सनं केलेल्या कॅश फॉर वोट गौप्यस्फोटाचा. या मुद्द्याचा वापर करत विरोधकांनी पाच राज्यात होणार्‍या विधानसभा निवडणुकींसाठी पॉईंट स्कोअर करण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भाजपनं लक्ष्य केलं.

पंतप्रधान बननं हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे असा लालकृष्ण अडवाणी यांचा समज असल्याचा टोला पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी लगावला होता. त्याचा समाचार घेत अरुण जेटली यांनी पंतप्रधानांना लोकशाहीबद्दल नाही तर घराणेशाहीबद्दल बोलायचं होतं असं प्रतिहल्ला केला. 2 जी स्पेक्ट्रमच्या तपासासाठी संयुक्त संसदीय समिती नेमण्याच्या मुद्द्यावरून हिवाळी अधिवेशन वाया गेलं होतं. विरोधकांची ही मागणी या अधिवेशनात सरकारने पूर्ण केली. गोंधळामुळे लोकसभेचे 25 तर राज्यसभेचे 20 तास वाया गेले.

close