मोनिका हत्या प्रकरणाचा तपास विशेष पोलीस महानिरीक्षक रश्मी शुक्ला यांच्याकडे

March 26, 2011 5:28 PM0 commentsViews: 1

26 मार्चनागपूरमधील मोनिका किरणापुरे हत्याप्रकरणाचा तपास आयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांकडे सोपवण्यात येणार आहे. रश्मी शुक्ला या मुंबईत विशेष पोलीस महानिरीक्षक आहेत. मोनिका हत्या प्रकरणाचं गुढ उकलण्यात अद्यापही नागपूर पोलिसांना यश आलेलं नाही. त्यामुळे नागपूरकरांमध्ये असंतोष वाढत होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास महिला अधिकार्‍याकडे सोपवण्याचा निर्णय गृहमंत्र्यांनी घेतला. आणि हा तपास रश्मी शुक्ला यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे.

close