राज्यात वैद्यकीय पदव्युत्तर जागा 1 हजार 906 वरून 411 वर !

March 26, 2011 6:08 PM0 commentsViews: 3

26 मार्चगेल्या आठ वर्षात राज्यातील वैद्यकीय शिक्षणाच्या पदव्युत्तर जागा निम्म्याहून कमी झाल्या आहे. 2001 सालापर्यंत राज्यात वैद्यकीय शिक्षणासाठी पदव्युत्तरच्या 1 हजार 906 जागा होत्या. पण 2008 साली याच जागा 411 एवढ्या कमी झाल्या आहेत. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियानं चुकीच्या निकषाची सक्ती केल्यामुळेच या जागा घटल्या आहेत असा आरोप 'पीपल्स हेल्थ ऑर्गनायझेशन' या संघटनेने केला. त्यासाठी तीन वर्षांपूर्वी त्यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेनंतर मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने 15 वर्ष प्रलंबित असलेली गर्व्हमेंट मेडिकल कॉलेजची इन्सपेक्शन पूर्ण केली. आता हायकोर्टाने कमी झालेल्या मेडिकल पदव्युत्तर जागाबद्दल राज्य सरकार, मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया आणि केंद्र सरकारला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 28 एप्रिलपर्यंत यावर त्यांनी स्पष्टीकरण मागितले आहेत.

close