जैतापूर गोळीबार प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करा – खडसे

April 19, 2011 9:47 AM0 commentsViews: 1

19 एप्रिल

जैतापूर प्रकल्प विरोधात आंदोलनात गोळीबार प्रश्नावरून विधानसभेत आज जोरदार गोंधळ झाला. विरोधी पक्षांनी स्थगन प्रस्तावाद्वारे जैतापूरवर चर्चेची मागणी केली होती. त्यानूसार विधानसभा अध्यक्षांनी ही चर्चा ताबडतोब सुरू केली. मात्र चर्चेदरम्यान राष्ट्रवादीचे नेेते नबाब मलिक यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली.

जैतापूरमधल्या आजच्या परिस्थितीला शिवसेनाच जबाबदार असल्याचा आरोप मलिक यांनी केला. त्यामुळे विरोधकही आक्रमक झाले. यावरून विदानसभेत जोरदार गोंधळ सुरू झाला. दरम्यान जैतापूर गोळीबार आंदोलनाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी मागणी केली.

मृत तबरेझच्या नातेवाईकांना 25 लाखांची मदत जाहीर करावी तसेच जखमी झालेल्यांना योग्य नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही त्यांनी केली. तर रत्नागिरीचे डीवायएसपी संजीव मोरे आणि प्रांत अधिकारी अजित पवार यांचीही चौकशी करावी अशी मागणी शिवसेनेचे गटनेते सुभाष देसाई यांनी केली. विधानभवनात स्थगन प्रस्तावाद्वारे जैतापूरवर चर्चा सुरू आहे.

close