आंदोलन पुर्वनियोजित – आर.आर.पाटील

April 19, 2011 4:58 PM0 commentsViews: 1

19 एप्रिल

जैतापूर आंदोलनावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. हे आंदोलन पूर्वनियोजित आहे असा आरोप गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विधानसभेत केला. आंदोलनामध्ये पोलिसांनी संयम बाळगला मात्र तरीही आंदोलकांनी पोलीस स्टेशनवर हल्ला केला. प्रकल्प रोखण्यासाठी चर्चेद्वारे मार्ग काढता येऊशकतो. आंदोलनाचा केल्याचा राग नाही पण शिवसेनेची भूमिकाचं दुटप्पी आहे. एकीकडे विकास व्हावा म्हणावं तर दुसरीकडे विकासाला विरोध करायचा आंदोलनाचा विचार व्हावा असं ही आबा म्हणाले. जैतापूरमधील गोळीबाराची दंडाधिकार्‍यांकडून चौकशी केली जाईल असंही त्यांनी सांगितलं. आंदोलकांना भडकवण्यात राजकीय हात होता का याचीही चौकशी होईल असं ते म्हणाले. गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या तबरेजच्या नातेवाईकांना आणि इतर जखमींना नियमानुसार मदत केली जाईल, असं निवेदनही आर. आर. पाटील यांनी विधानसभेत दिलं.

close