पाण्याचा प्राधान्यक्रम बदलला जाणार नाही – मुख्यमंत्री

April 19, 2011 4:58 PM0 commentsViews: 3

19 एप्रिल

वादग्रस्त जलसंपदा नियमन विधेयकावरुन पेटलेला वाद आता चांगलाच चिघळला. कुठल्याही परिस्थितीत धरणातल्या पाण्याचा प्राधान्यक्रम बदलला जाणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना दिलंय. पाण्याचा अग्रक्रम पिण्याला त्यानंतर दुसर्‍या क्रमांकावर शेतीला आणि तिसर्‍या क्रमांक उद्योगाला असा प्राधान्यक्रम राहिल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही दिली. पण विधानसभेनं मंजूर केलेलं हे विधेयक विधान परिषदेत मंजूर होणार नाही अशी भूमिका काँग्रेसने घेतली. त्यामुळे अखेर हे विधेयक विधान परिषदेतून परत विधान सभेकडे फेरविचारासाठी पाठवण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला आहे.

close