शिवसेना कार्याध्यक्षांची छाव्यासह सैर !

April 19, 2011 11:08 AM0 commentsViews: 3

19 एप्रिल

एकीकडे जैतापूर प्रकल्पाविरुद्धच्या आंदोलनाचा भडका उडाला. पण दुसरीकडे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे मात्र कान्हा अभयारण्यात फेरफटका मारण्यात गुंग आहेत. उद्धव ठाकरे आज सकाळी नागपूरहून कान्हाला रवाना झाले. एअरपोर्टजवळच्या प्राईड हॉटेलमधून ते थेट मध्य प्रदेशला गेले आहेत.

आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार उध्दव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि त्यांचे सचिव मिलिंद नार्वेकरसुध्दा आहेत. सध्या उध्दव ठाकरे कान्हा अभयारण्याजवळील किसली सरकारी विश्रामगृहात आहेत आणि त्याठिकाणी त्यांचं 23 एप्रिलपर्यंत बुकिंगसुध्दा आहे. एकीकडे शिवसेनेचे कार्यकर्ते, नेत्यांची जैतापूरमध्ये आंदोलनात पोलिसांबरोबर धुमश्चक्री सुरु आहे.

एका आंदोलकाचा आज बळीही गेला शहरात तर जमाव बंदी लागू करण्यात आली आहे आणि एवढं सगळं रत्नागिरीत घडत असताना या शिवसेनेचे सैनिकांचे कार्यकारी अध्यक्ष आणि युवा नेते मात्र अभयारण्यात सुट्टीची मज्जा करण्यात लुटत आहेत. शिवसेनेनंच जैतापूर विरोध लावून धरला होता.

काही दिवसांपूर्वीच उध्दव ठाकरे यांनी जैतापूरचा दौरा करुन प्रकल्प होऊ देणार नाही असा नारा दिला होता. आंदोलनाची घोषणा तर दिली पण प्रत्यक्ष आंदोलनाच्या वेळी उध्दव ठाकरे फिल्डवरुन गायब अशीच अवस्था झाली आहे. नागपूरमध्ये असतानासुध्दा त्यांनी जैतापूर आंदोलनाबद्दल पत्रकारांशी बोलायला नकार दिला. काल जैतापूरमध्ये पेटलेलं आंदोलन बघून उध्दव ठाकरेंना त्यांचा दौरा रद्द करता आला नसता का असाच प्रश्न सगळे विचारत आहे.

close