समीर कुलकर्णीला 6 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी

December 30, 2008 9:40 AM0 commentsViews: 1

30 डिसेंबर मुंबईसुधाकर कांबळे मालेगाव बॉम्बस्फोटातला आरोपी समीर कुलकर्णी याचा मध्यप्रदेशातल्या चर्चवरील हल्ल्याच्या प्रकरणातही हात असल्याचं उघडकीस आलंय. पुण्याजवळच्या खडकीमधल्या चर्चवर हल्ल्याप्रकरणीही समीर कुलकर्णीची चौकशी सुरू आहे. मालेगाव बॉम्बस्फोटातला आरोपी समीर कुलकर्णी अभिनव भारत संघटनेचा पदाधिकारी आहे. अभिनव भारतच्या काही सदस्यांवर मध्यप्रदेशातल्या ख्रिश्चन मिशनरींवर हल्ला केल्याचा आरोप आहे. यात समीर कुलकर्णीही होता, असं आता उघड झालं आहे. मध्यप्रदेशातल्या हल्ल्यात समीर कुलकर्णीचा कसा सहभाग आहे, त्याच्यासोबत इतर कोणकोण साथीदार आहेत, तसंच मालेगाव बॉम्बस्फोटातल्या काही आरोपींची चर्चवरील हल्ल्यात त्याला साथ मिळाली होती का यादृष्टीने मध्य प्रदेश पोलीस तपास करणार आहेत. मालेगाव बॉम्बस्फोटातल्या आरोपींना 6 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

close