राहुलचं संगीत नाटक ‘संशयकल्लोळ’

April 19, 2011 5:49 PM0 commentsViews: 3

19 एप्रिल

कट्यार काळजात घुसली या संगीत नाटकाच्या यशानंतर आता राहुल देशपांडे एक हलकंफुलकं संगीतनाटक घेउन येतोय. ज्याचं नाव आहे संगीत संशयकल्लोळ. या नाटकाचा पहिला प्रयोग येत्या रविवारी 24 तारखेला सादर होणार आहे. सध्या या नाटकाची जोरदार तयारी सुरु आहे.

गेली जवळपास 100 वर्ष नाट्यरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारं गोविंद बल्लाळ देवल यांचं नाटक म्हणजे संगीत संशयकल्लोळ. मृगनयना रसिक मोहिनी, धन्य आनंद दिन अशी अनेक गाणी आजही रसिकांना आवडतात. मुळ पाच अंकी असणारं हे नाटक पुन्हा एका रसिकांसमोर येतंय. तेही अगदी नवीन तरुणांच्या संचात. यातल्या मुख्य अश्विनशेठच्या भुमिकेत आहे स्वतः राहुल देशपांडे. सध्या या नाटकाचं जोरदार तालमी सुरु आहेत.

राहुलचे आजोबा वसंतराव देशपांडेंनी या नाटकाचे जवळपास पन्नास प्रयोग सादर केले. त्यामुळे तो हे नाटक सादर करताना अगदी नॉस्टॅल्जिक झाला. पण या नाटकाची बाकी टिम मात्र अगदीच नवीन आहे. एरवी प्रायोगिक नाटकं आणि तरुणाईशी निगडित विषय हाताळणारी मुलं आता या माध्यमातून पहिल्यांदाच संगीत नाटक सादर करत आहे. या नाटकाचं दिग्दर्शन करतोय निपुण धर्माधिकारी. येत्या 24 तारखेला या नाटकाचा पहिला प्रयोग होणार आहे. या निमित्त तरुणांना संगीत नाटकांची गोडी लागेल असाच विश्वास हे सगळे जणं व्यक्त करत आहे.

close