काका घेणार पुतण्याची खबर !

April 20, 2011 9:27 AM0 commentsViews: 9

20 एप्रिल

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दादा घोटाळ्याचा गौप्यस्फोट काल मंगळवारी आयबीएन लोकमतने केला. यानंतर अजितदादांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही, आम्ही वारंवार फोन लावला पण आम्हाला अजित पवारांकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. मात्र यावेळी काकांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांच्या ए.जी.मर्कंटाईलबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही. याबद्दल आपल्याला अजित पवारांशी बोलावं लागेल असं पवारांनी म्हटलं आहे. मला तुमच्याकडूनच ही माहिती समजतेय असंही पवार म्हणाले आहेत.

दादा घोटाळ्याबद्दल अजित पवारांना आयबीएन लोकमतचे सवाल

1. ए.जी.मर्कंटाईल ही कोणाची कंपनी आहे? यात तुमची गुंतवणूक आहे का ?2. या कंपनीत तुमचे 8 हजार 800 शेअर्स असताना तुम्ही ते का नाकारता ?3. स्वत:ची गुंतवणूक असलेल्या याच कंपनीला स्वत: मंत्री असलेल्या जलसंपदा खात्याकडून दोन वेळा ठेका देणं, हा पदाचा गैरवापर नाही का ?4. बोटिंग, त्यासाठी धक्का बांधणं आणि पाणीउपसा यांची परवानगी या कंपनीला दोनच दिवसात जलसंपदा खात्यानं कशी दिली ?5. ए.जी.मर्कंटाईल कंपनीमध्ये गुंतवणूक असताना निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्याचा उल्लेख का केला नाही ?6. प्रतिज्ञापत्रात माहिती लपवणं, हा निवडणूक कायद्याचा भंग नाही का ?7. 2 जी घोटाळ्यातील एक आरोपी विनोद गोएंका हे ए.जी.मर्कंटाईल कंपनीचे संचालक आहेत का ?8. विनोद गोएंका यांच्याशी तुमचे व्यावसायिक संबंध आहेत का ?

हे आयबिएन लोकमतचे अजित पवारांना सवाल आहेत. त्याची उत्तरं पवारांना द्यावीच लागतील.

close