राज ठाकरेंवरील भाषण बंदी उठवली

December 30, 2008 2:03 PM0 commentsViews: 112

30 डिसेंबर मुंबईमुंबई पोलिसांनी राज ठाकरे यांच्यावर टाकलेली बंदी उठवली आहे. राज्य मानवी हक्क आयोगाकडे मुंबईचे कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सहपोलीस आयुक्त के एल प्रसाद यांनी प्रतिज्ञापत्र सादर केलं. त्यात राज ठाकरे यांच्यावरील भाषणबंदी उठवल्याचं स्पष्ट केलं आहे.गेल्या दोन महिन्यापासून मुंबई पोलिसांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर भाषणबंदी लावलेली होती. 19ऑक्टोबरला रेल्वेभरती बोर्डाच्या परीक्षेच्यावेळी मनसेने उत्तर भारतीयांविरुद्ध तीव्रआंदोलन केलं होतं. त्यानंतर राज्य सरकारने 21 ऑक्टोबरपासून राज ठाकरे यांच्यावर भाषणबंदी लागू केली होती. मुंबईचे कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सहपोलीस आयुक्त के एल प्रसाद यांनी राज्य मानवी हक्क आयोगाकडे एक अहवाल सादर केला त्यात या आंदोलनानंतर कोणती कारवाई केली हे स्पष्ट केलं आहे. त्यानंतर आता ही बंदी उठवण्यात आली आहे.

close