साईबाबा संस्थान मंडळ बरखास्त करण्यासाठी शिर्डी बंद

April 20, 2011 12:29 PM0 commentsViews: 7

20 एप्रिल

शिर्डीचं साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ बरखास्त करावे या मागणीसाठी आज शिर्डी बंद पुकारण्यात आला. ट्रस्टी मंडळाची मुदत 3 वर्ष असतांना 7 वर्ष झाली तरी ट्रस्टी मंडळ बदललं गेलं नाही. विद्यमान ट्रस्टी मंडळाने अनेक भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार केल्याचा शिर्डीकरांचा आरोप आहे.

म्हणूनच विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यासाठी आज शिर्डी बंद पुकारण्यात आला आणि त्यासाठी शिर्डीकरांनी उपोषणही सुरू केलंय. द्वारकामाईसमोर शिर्डीकर उपोषणाला बसले आहेत. शिर्डीला बंद पुकारण्यात आला असला तरी साईभक्तांना कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही. जेवण, दर्शन, निवासाची व्यवस्था सुरु असून मंदिर दर्शनासाठी खुलं आहे.

close