आंदोलनावर माझं बारीक लक्ष – उध्दव ठाकरे

April 20, 2011 2:07 PM0 commentsViews: 6

20 एप्रिल

काल मंगळवारी रत्नागिरी पेटलं होतं तेव्हा उद्धव ठाकरे जंगल सफारीवर गेल्याच्या बातम्या मीडियाने दाखवल्या होत्या. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आज मीडियालाच धारेवर धरलं. मी 9 तारखेला जैतापूर दौर्‍यावर गेलो होतो तेव्हा मीडिया कुठ होती आणि जेव्हा आंदोलकांना दडपशाही होत होती तेव्हा मीडिया कुठे होती असा सवालच त्यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून केला आहे. तसेच आंदोलनावर माझं बारीक लक्ष आहे. कार्यकर्त्यांना योग्य मार्गदर्शन देत आहे हेही त्यांनी पत्रकात स्पष्ट केलंय.

मात्र नारायण राणेंनी शिवसेना या मुद्द्याचं राजकारण करतेय असा आरोप करत जैतापूर मधील आंदोलकांना शांततेचं आवाहन केलं. सोमवारी जैतापूरमध्ये झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण घेतलं आणि पोलिसांच्या गोळीबारात एका तरूणांची मृत्यू झाला. या प्रकरणाच्या निषेधात शिवसेनेनं रत्नागिरी जिल्हा बंद आंदोलन पुकारलं होतं. काल रत्नागिरीत ठिकठिकाणी जाळपोळीच्या घटना ही घडल्या परिणामी जमावबंदी लागू करण्यात आली होती.

close