अखेर अकोला जिल्हापरिषदेची सत्ता भारिपकडेच

December 30, 2008 1:34 PM0 commentsViews: 7

30 डिसेंबर अकोलाअकोला जिल्हापरिषदेत प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघानं सत्ता कायम ठेवली आहे. अकोल्यात अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत अध्यक्षपदी भारिप बहुजन महासंघाच्या साबिया अंजूम सौदागर तर उपाध्यक्षपदी दामोदर जगताप यांची निवड झाली आहे. 52 सभासद असलेल्या अकोला जिल्हा परिषदेच्या सभागृहात साबिया अंजूम सौदागर यांनी शिवसेनेच्या गायत्री कांबे यंाचा 27 विरुद्ध 18 मतांनी पराभव केला. त्या पहिल्या मुस्लीम जिल्हा परिषद अध्यक्ष ठरल्या आहेत. अकोला जिल्हा निवडणुकीत भारिप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आला होता. पण कुठल्याच पक्षाला बहुमत मिळालं नसल्यानं त्रिशंकू अवस्था निर्माण झाली होती. भारिपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन महाआघाडी तयार केली होती. पण, ही आघाडी जास्त काळ तग धरू शकली नाही. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीनं भारिपच्या बाजूनं मतदान केलं. तर काँग्रेसनं मतदान केलं नाही

close