मुंबई इंडियन्सचा दणदणीत विजय

April 20, 2011 2:24 PM0 commentsViews: 7

20 एप्रिल

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने तिसर्‍या विजयाची नोंद केली आहे. मुंबईने पुणे वॉरियर्स इंडियावर 7 विकेट राखून मात केली आहे. आयपीएलमध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्रातल्याच दोन टीम आमने सामने आल्या होत्या. त्यामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये जबरदस्त उत्सुकता होती. आणि या मॅचमध्ये मुंबईची टीम सरस ठरली आहे.

मुंबईच्या भेदक बॉलिंगसमोर पुणे वॉरियर्सची टीम अवघ्या 118 रन्सवर ऑलआऊट झाली. रॉबिन उत्थप्पा वगळता पुण्याचे प्रमुख बॅट्समन सपशेल फ्लॉप ठरले. विजयाचे आव्हान मुंबई इंडियन्सने 3 विकेटच्या मोबदल्यात पार केलं. सचिन तेंडुलकर अंबाती रायडूने दुसर्‍या विकेटसाठी 74 रन्सची पार्टनरशिप करत विजयाचा पााय रचला. तर सायमंड आणि रोहित शर्माने मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. मुंबई इंडियन्सचा आयपीएलमधला हा तिसरा विजय होता. तर पुणे वॉरियर्सचा 4 मॅचमधला हा दुसरा पराभव ठरला आहे.

close