स्पेक्ट्रम प्रकरणी 5 जणांची कारागृहात रवानगी

April 20, 2011 3:05 PM0 commentsViews: 2

20 एप्रिल

टू जी घोटाळाप्रकरणी पतियाळा विशेष कोर्टाने आज पाच कॉर्पोरेट असामींचा जामीन फेटाळला आहे. रिलायन्सचे एक्झिक्युटिव्ह गौतम दोशी, हरी नायर, संजय पिपारा, यूनीटेकचे संजय चंद्रा आणि डीबी ग्रुपचे विनोद गोएंका यानी जामीनासाठी अर्ज केला होता. यापैकी विनोद गोयंका याचं अजित पवार यांच्याशी भागीदारी असल्याचे वृत्त काल मंगळवारी आयबीएन लोकमतने प्रसारीत केलं होतं. जर चौकशीदरम्यान जर सीबीआयने आपल्याला अटक केली नव्हती तर आता अटकेची गरज नाही असं या पाचजणांनी अर्जात म्हटलं होतं. तर सीबीआयने मात्र या पाच जणांना जामीन द्यायला विरोध दर्शवला होता. दरम्यान या पाचही जणांना तिहार जेलमध्ये पाठवण्यात येणार आहे.

close