अपहरणकर्त्याच्या तावडीतून कर्नितची सुटका

April 20, 2011 3:10 PM0 commentsViews: 4

20 एप्रिल

कांदिवलीमधून कर्नित शहा या 6 वर्षाच्या मुलाचं अपहरण झालं होतं. त्याच्या सुटकेसाठी 1 कोटींची खंडणी मागण्यात आली होती. कर्नितच्या शोधासाठी मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेचे सुमारे 40 ते 45 पथक शोध घेत होती. काल अखेर या पथकाला यश आलंय. कर्नितच्या अपहरण कर्त्याला युपीमधून पकडण्यात आलंय. कर्नितची सुखरुप सुटका करण्यात मुंबई पोलिसांना यश आलंय. लवकरच त्याला मुंबईत आणण्यात येणार आहे. मुंबई पोलीस दलातील पोलीस निरीक्षक राकेश शर्मा यांच्या ताब्यात सध्या कर्नित आहे.

close