कोयनेच्या पाण्यापासून 2000 मेगावॅट वीज निर्मिती शक्य

December 30, 2008 3:33 PM0 commentsViews: 20

30 डिसेंबर रत्नागिरीदिनेश केळूसकर विजेची गरज भागवण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल 5 औष्णिक वीज प्रकल्प निर्माण होत आहेत. पण कोयनेच्या पाण्यापासून 2000पेक्षाही जास्त मेगावॅट वीज निर्मिती होऊ शकते असं कोयना अवजल अभ्यास गटाच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. रत्नागिरीत अवघ्या 110 किलोमीटरच्या अंतरात 5 औष्णिक वीज प्रकल्प होत आहेत.पण या प्रकल्पांच्या एक त्रित प्रदूषणाचा फटका निर्यातक्षम हापूस आंब्याला बसू शकतो.या प्रस्तावित खाजगी प्रकल्पांमधून मिळणारी 15000 मेगावॅट वीज गरजेचीच आहे.पण रत्नागिरी जिल्ह्यातूनच वाहणा-या कोयनेच्या पाण्यापासून प्रदूषण विरहीत वीज निर्मिती होऊ शकते.2006 मध्येच कोयना अवजल अभ्यास गटाचा अहवाल सरकारला सादर झालेला आहे पण सरकारने अजूनही तो प्रकाशित केलेला नाही आणि त्याच्याबाबत अन्य कोणतीही पावलं उचलण्यात आलेली नाहीत.थेट समुद्राला मिळणा-या कोयनेच्या पाण्यातून, कोकणच्या पिण्याच्या पाण्यापासून ते कृषी उत्पन्नांपर्यंत अनेक समस्या मार्गी लागू शकतात. फक्त गरज आहे ती सरकारने या अहवालाची अंमलबजावणी करण्याची.

close