इम्रान खान सभेदरम्यान 14 फुटांवरून कोसळले

May 7, 2013 4:42 PM0 commentsViews: 40

07 मे

लाहोर : पाकिस्तानचे क्रिकेटर आणि तहरिक-ए-इंसाफ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान आज गंभीर जखमी झालेत. पाकिस्तानात 11 मे रोजी निवडणूक होतेय. या निवडणुकीसाठी इम्रान खान यांनी लाहोरमध्ये एक प्रचार सभा घेतली. या सभेला संबोधित करताना इम्रान खान 14 फूच उंचीवरून खाली पडले. यामुळे त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय.

close