अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या नराधमाला बेदम चोपले

May 8, 2013 2:25 PM0 commentsViews: 27

08 मे

नागपूरच्या जरीपटका पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या भीमनगरमध्ये एका सहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली. अनाथ असलेल्या ही मुलगी आपल्या आजी सोबत राहते. शेजारी राहणार्‍या राजकुमार लांजेवार या 60 वर्षाच्या व्यक्तीनं या मुलीला घरी बोलवलं आणि तिच्यावर अत्याचार केला. या घटनेनंतर संतापलेल्या लोकांनी आरोपीला बेदम चोप दिला. आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.

close